Header Ads

नळदुर्ग : अवैध मद्य विरोधी कारवाई
 नळदुर्ग: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन पो.ठा. नळदुर्ग च्या पथकाने दि. 11.10.2020 रोजी पो.ठा. हद्दीत दोन ठिकाणी छापे मारेले. यात पहिल्या घटनेत जळकोट येथील हॉटेल रुद्रच्या बाजूस तानाजी राजाराम चव्हाण, रा. जळकोट, ता. तुळजापूर हा देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,040/-रु.) विनापरवाना बाळगलेला तर दुसऱ्या घटनेत नळदुर्ग येथील हॉटेल निसर्गच्या बाजुस विशाल विठ्ठल मुगळे, रा. करवंजी, ता. लोहारा हा देशी दारुच्या 07 बाटल्या (किं.अं. 364/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


मोटार वाहन कायदा अंतर्गत 92 कारवाया- 20,300 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त


उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 11.10.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 92 कारवाया करुन 20,300 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

No comments