उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात दोन ठार
 येरमाळा: कैलास रामभाऊ साठे, वय 55 वर्षे, रा. चोराखळी, ता. कळंब हे दि. 28.01.2020 रोजी 22.30 वा. सु. चोराखळी येथील हॉटेल कामत समोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन पायी चालत जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागुन धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर संबंधीत वाहनचालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या विद्या कैलास साठे (मयताची पत्नी) यांनी आकस्मात मृत्युच्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


वाशी: मोटारसायकल क्र. एम.एच. 42 एई 1779 च्या अज्ञात चालकाने दि. 16.10.2020 रोजी 17.00 वा. सु. वाशी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवून महामार्गावरील दुभाजकास धडक देउन गंभीर जखमी होउन स्वत:च्या मृत्युस कारणीभुत झाला. यावरुन पो.ठा. वाशी चे सुनिल रणदिवे यांनी दि. 17.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत मयत व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


पोलीस चेकपोस्टच्या अडथळयांस वाहनाची धडक


 तुळजापूर: तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तुळजापूर येथील लातूर पर्यायी मार्गावर नवरात्री महोत्सवानिमीत्त पोलीस यंत्रणा तैनात आहे. या ठिकाणी वाहने चौकशी करीता थांबावीत याकरीता अडथळे (बॅरीकेड्स) रस्त्यावर ठेवण्यात आले आहेत. दि. 16.10.2020 रोजी 20.10 वा. निजाम मकबुल बडगिरे, रा. बलसुर, ता. उमरगा याने त्याच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे चालवून सदर अडथळ्यांना धडक देउन शासनाचे आर्थिक नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या पोकॉ- नेताजी जगताप यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमुद चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 427 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.No comments