Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हुंडाबळी, चोरी, अपघात, मारहाण गुन्हे दाखल

 


परंडा: संजीवनी राहुल खरसडे, वय 33 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी, परंडा यांनी दि. 13.10.2020 रोजी सासरी- तांदुळवाडी येथील राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली होती. संजीवनी यांच्या लग्नात मानपान न दिल्याच्या, लग्न मोठे न केल्याच्या, ठरल्या प्रमाणे हुंड्यातील बाकी पैसे व दागिने माहेराहुन आणत नसल्याच्या कारणावरुन 1) राहुल शिवाजी खरसडे (पती) 2) चित्रा (सासु) 3)अनिता रणजीत खरसडे (जाउ), सर्व रा. तांदुळवाडी, ता. परंडा यांनी संजीवनी यांचा सतत शारिरीक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने संजीवनी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या संजीवनी यांचे पिता- विश्वास दत्तात्रय पाटील, रा. शिराढोन, ता. कळंब यांनी दि. 13.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (ब), 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

कळंब: चांगदेव महादेव हारकर, रा. कल्पना नगर, कळंब यांच्या कृषी उत्पन्न बाजार समीती, कळंब येथील आडत दुकानाचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 13.10.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील रोख रक्कम 35,000/-रु. व 6 पोती सोयाबीन असा एकुण 44,120/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या चांगदेव हारकर यांनी दि. 14.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


अपघात


तामलवाडी: एका अज्ञात वाहनाने दि. 11.10.2020 रोजी 20.30 वा.सु. सांगवी (काटी) तलावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर पायी चालत जानाऱ्या एका 55 वर्षीय अनोळखी पुरुषास धडक दिली. या अपघातात संबंधीत पुरुष गंभीर जखमी होउन मयत झाला असुन संबंधीत अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरुन वाहनासह पळ काढला. अशा मजकुराच्या पो.ठा. तामलवाडी चे पोना- गोरोबा गाढवे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मारहाण

ढोकी: दत्तात्रय जनार्धन दांगट, रा. खेड, ता. उस्मानाबाद हे दि. 05.10.2020 रोजी 17.00 वा.सु. खेड शिवारातील स्वत:च्या शेतात होते. यावेळी भाऊबंद- भागवत दांगट हे सोयाबीनचे पिक दत्तात्रय दांगट यांच्या शेतातून वाहुन नेत असतांना दत्तात्रय यांनी भागवत यांना बांधावरुन जाण्यास सांगीतले. या वादातून चिडून जाउन भागवत दांगट व प्रनव दांगट या दोघा पिता- पुत्रांनी दत्तात्रय यांना काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दत्तात्रय यांनी दि. 13.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments