Header Ads

उमरगा बलात्कार प्रकरणारील नराधमांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपा महिला मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन     उस्मानाबाद -   उमरगा येथील  लक्ष्मी पाटी परिसरातील वीटभट्टीवर मजुरी करणाऱ्या पारधी समाजाच्या महिलेवर वीट भट्टी चालक व अन्य तिघे अशा चार नराधमांनी सदरील महिलेस पळवून नेऊन तिच्यावर आठवडाभर दुष्कर्म केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे परंतु त्यांना आणखीन अटक झालेली नाही.


महाराष्ट्रात दिवसेंदिवस बलात्कार, हत्या होत आहेत, तरी हे राज्य सरकार कुंभकर्णाची झोप घेत आहे रोज मोकाट हरामखोराकडून महिला मुलींच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.


उठ द्रौपदी सशस्त्र उचल, आता गोविंदा येणार नाही तुझ्या सुरक्षेसाठी! असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. तरी सदर नराधमांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन भाजपा जिल्हा महिला आघाडी व युवती मोर्चा यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

     याप्रसंगी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष माधुरीताई गरड, महिला मोर्चा चिटणीस आशाताई लांडगे, युवती मोर्चा जिल्हा सरचिटणीस पूजा राठोड उपस्थित होत्या. 

No comments