Header Ads

तुळजापूर : मराठा क्रांती मोर्चात सहभागी तरुणावर गुन्हे दाखल
तुळजापूर: मराठा आरक्षणासाठी सकल  मराठा समाजाने पुन्हा एकदा रणशिंग  फुंकले आहे. ९ ऑक्टोबर रोजी तुळजापुरात  खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलनाच्या तिसऱ्या पर्वास  सुरुवात झाली. मात्र पोलिसांनी मोर्चात सहभागी झालेल्या काही तरुणावर गुन्हे दाखल केले आहेत. या  मराठा आरक्षण मोर्चात सुमारेअडीच हजार लोकांची गर्दी जमली होती. गर्दीतील अनेकांनी मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे अशा स्वरुपाचे निष्काळजीपणाचे कृत्य करुन कोविड- 19 प्रसाराची शक्यता निर्माण केली. यावरुन गर्दी जमवणारे आयोजक- 1)सज्जन साळुंके 2)जिवन इंगळे 3)अर्जुन साळुंके 4)महेश डोंगरे 5)धैर्यशील पाटील 6)सुनिल नागने 7)अजय साळुंके, सर्व रा. तुळजापूर यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 270 आणि म.पो.का. कलम- 135 अन्वये गुन्हा पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदवला आहे.

No comments