शेतकऱ्यांनी धीर धरावा, खचून जावू नये - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 
 शेतकऱ्यांनी धीर धरावा, खचून जावू  नये - मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे


तुळजापूर -  शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, धीर धरावा.  हे शासन पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून शेतकऱ्यांचे आयुष्य चांगले होईल, मदतीबाबत या शासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काटगाव येथील शेतकरी बांधवांना दिली. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ,उस्मानाबाद जिल्ह्याचे पालक मंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, विभागीय सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह शेतकरी व काटगाव ग्रामस्थ उपस्थित होते



मुख्यमंत्र्यांनी  शेतकऱ्यांसमोर केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे :


# माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो मी बऱ्याच दिवसानंतर आपल्या भेटीला येथे आलेलो  आहे 

# हा जिल्हा मला काही नवीन नाही तुम्हाला ही काही नवीन नाही मी आणि मला काही नवीन नाही तुम्ही 

# यापूर्वी जेव्हा मी आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो तुमच्या आशीर्वादाने ध्यानीमनी नसताना ही जबाबदारी माझ्यावर आली आहे 

# तुमच्या आशीर्वादाचे फळ आहे माझे कर्तृत्व त्यात शून्य आहे 

# आजची जी  परिस्थिती आहे हे भयानक आहे असं काही नाही की आपण संकटाचा सामना केला नाही किंवा संकट पाहिले नाही 

# या वर्षाची सुरुवात जागतिक संकटाने  झाली  आणि आता बाहेर पडू पडू म्हणता म्हणता तो पाऊस सुरू झाला निसर्ग चक्रीवादळ पाउस जाता जाता म्हणता म्हणता समोरच  होत्याच नव्हतं होऊन गेल 

# एक अतिवृष्टीचा इशारा होता. मला कल्पना आहे की तुम्ही मोठ्या अशा अपेक्षेने मला भेटायला आला आहात काय करणार किती करणार मी नुसती घोषणा करायला  नाही आहे मी जे बोलतो ते मी करतो म्हणजे करू शकत नाही ते मी बोलणार नाही 

# एक तुम्हाला सांगतो तुम्ही नुसतं बरं वाटावं टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी आकड़ा  घोषित करायला आलो नाही मी तुम्हाला दिलासा द्यायला  आधार द्यायला आलेलो आहे 

# दोन दिवसांपूर्वी अक्कलकोट ला गेलो होतो स्वामी समर्थांच्या मठा मध्ये नाही गेलो ,  मंदिर बंद बाहेरूनच ऑनलाईन दर्शन घेतलं स्वामींच वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी स्वामीनां नमस्कार केला तुम्ही माझ्या पाठीशी राहा 

# या सरकारची ताकद माय भगिनींच्या पाठीशी उभी करेल आता तुम्हाला भेटल्यानंतर जाताजाता तुळजाभवानीच्या दारासमोर जाणाऱ,  मंदिर बंद आहेत संकट आलेल आहे की मंदिर बंद आहेत सगळे प्रार्थनास्थळ बंद आहेत आणि तिच्यासमोर जाऊन तिच्या दरवाज्यात  एक साकडे घालणार आहे की बाई दार उघड तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही दार उघडायचं तसं नाही ज्या कारणासाठी दार बंद केले ते संकट दूर कर आणि   या संकटात संकट  सगळे खचून जात आहे संकट दुरकर आणि पुन्हा एकदा आयुष्याचा दरवाजा उघड हे दार उघड 

# आज मी तुमच्या समोर आलो हा दिलासा द्यायला आलेलो आहे कांदे गेले , उस गेले , द्राक्ष गेलं सगळं आयुष्य उध्वस्त झालेल आहे जमिनीच्या जमीन खरडून गेली आहे या पुलावरून आठ ते दहा फुटावर पाणी वाहत होते 

# हे सगळे घडत असताना तुमच्या विश्वासावर  आम्ही हा कारभार करत आहोत आज उद्या मध्ये मंत्रिमंडळाची सुद्धा आमची बैठक होईल आणि त्याच्यात जोपर्यंत सर्व पंचनामे 80, 90 टक्के पूर्ण होत आले आहेत लवकरात लवकर पूर्ण ताकदिने  तुमचे आयुष्य पूर्ण ऊभे  करण्यासाठी हे महाराष्ट्र सरकार वचनबद्ध आहे मी तुम्हाला वचन द्यायला आलेलो आहे , आकडा सांगायला आलेलो नाही 

# आम्ही करू ते तुमच्या समाधानासाठी करू तुमच्या आयुष्यासाठी करू तुमच्या सुखा समाधानासाठी करू एवढेच आपल्याला वचन देतो 

# धीर सोडू नका खचून जाऊ नका आणि मगाशी माझ्या सोबत शेतकरी दादा आले ते तर रडायलाच लागले एक छोटीशी मुलगी पाचवीतली शाळा बंद आहे शाळा कोरोना मुळे बंद आहेत 

# या संकटांमध्ये तुमच्या आशीर्वाद तुमचा विश्वास असाच राहू दे 

जय हिंद जय महाराष्ट्र

From around the web