लोहारा : १० वर्षाच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार, तीन जणांवर अखेर गुन्हा दाखल

 
 लोहारा : १० वर्षाच्या शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार, तीन जणांवर अखेर गुन्हा दाखल


उस्मानाबाद -  लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील एका  दहा वर्षाच्या अल्पवयीन शाळकरी मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या तीन जणांवर  मंगळवारी रात्री उशिरा लोहारा पोलीस स्टेशन मध्ये अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी १६ ते १७ वयोगटातील आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


सास्तूर येथील एका १० वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना सोमवारी ( दि. १९) निदर्शनास आली. चिमुकलीवर रविवारी (दि. १८) गावातील तीन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केले. सोमवारी सदरील मुलीला त्रास होत असल्याने दवाखान्यात नेले होते. त्यावेळी सदरील मुलीची प्रकृती पाहून मुलीला लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी या मुलीवर पाळत ठेऊन तिच्यावर राहत्या घरी अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पीडितेची प्रकृती खालावली.तिच्या पालकांनी तिला स्पर्श ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी तिच्या आई - वडिलांनी उलट्या , जुलाब होत असल्याचे सांगितले . परंतु , डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली . त्यात तिने चौघांनी अत्याचार केल्याचे सांगितले . 



पीडित मुलीची प्रकृती खालावल्याने तिला लातूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांना सदरील घटना कळल्यानंतर त्यांनी लातूर येथील सरकारी रुग्णालयात जाऊन कुटुंबाची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे अद्यापही सदरील आरोपींवर कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचा आरोप आमदार अभिमन्यू पवार मंगळवारी सकाळी यांनी केला होता. 


महिला/मुलींवर लैंगिक अत्याचार सत्र सुरुचं आहे मुख्यमंत्री महोदय...... आपल्या कुटुंबातं रोज घडतयं हे.......याची जबाबदारी कोण घेणार मुख्यमंत्री महोदय...... - चित्रा वाघ

Posted by Osmanabad Live on Wednesday, October 21, 2020

मंगळवारी (दि. २०) पीडित मुलीच्या वडिलांनी लातूर येथे महिला पोलिस अधिकाऱ्याला दिलेल्या जवाबावरून लोहारा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा या प्रकरणातील आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक आर. एम. जगताप हे करत आहेत.या घटनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या अत्याचार प्रकरणी लवकर गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. 


उस्मानाबाद जिल्ह्यात एक महिन्यात १२ अत्याचार 

उस्मानाबाद  जिल्ह्यात गेल्या एक महिन्यात अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांवर १२ ते १३ अत्याचार झाल्याची नोंद पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे. पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक संपला असल्याचा आरोप केला जात आहे. 


लोहारा - दहा वर्षाच्या मुलीवर चार जणाचा सामुहिक अत्याचार पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याचा आ.अभिमन्यू पवार यांचा आरोप https://www.osmanabadtoday.com/2020/10/Lohara-Rape-girl-critical-condition.html

Posted by Osmanabad Live on Tuesday, October 20, 2020

यापूर्वीचे वृत्त वाचा 

लोहारा - दहा वर्षाच्या मुलीवर चार जणाचा सामुहिक अत्याचार

From around the web