Header Ads

ढोकी : मासेमारीच्या कारणावरून तरुणाचा खूनढोकी: सलिम हशमोद्दीन शेख, वय 49 वर्षे, रा. टाकळी (ढोकी), ता. उस्मानाबाद हे दि. 16.10.2020 रोजी 09.00 वा. सु. भंडारवाडी येथील तेरणा नदीवर मासे पकडण्यासाठी गेले होते. यावेळी 1) मुन्ना रावसाहेब अंधारे 2) गोविंद चंदु एडके, दोघे रा. भंडारवाडी, ता. उस्मानाबाद यानी मासेमारीच्या कारणावरुन सलिम शेख यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केल्याने मुकामार लागुन ते मयत झाले. अशा मजकुराच्या मोहसीन सलीम शेख (मयताचा मुलगा) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


चोरी

 लोहारा: श्रीकांत कुंडलीक देशमुख, रा. बेंडकाळ, ता. लोहारा यांनी स्वत:ची होंडा ड्रिम युगा मो.वा. एम.एच. 25 एबी 7917 ही दि. 13.10.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावली होती. ती मध्यरारात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या श्रीकांत देशमुख यांनी दि. 16.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments