शिराढोण : आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या पतीवर गुन्हा दाखल


 शिराढोण : लग्नात हुंडा दिला नसल्याच्या व लग्न मनासारखे न केल्याच्या कारणावरुन माहेरहुन पैसे आणावे असा तगादा विनोद ज्ञानोबा झोंबाडे (पती) रा. करंजकल्ला, ता. कळंब याने पत्नी- अनिता विनोद झोंबाडे, वय 23 वर्षे, हिच्याकडे लावला होता. त्याकरीता तो पत्नी- अनिता हिचा मागील चार वर्षापासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करत होता. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून अनिताने दि. 09.10.2020 रोजी 07.00 वा. सु. सासरी करंजकल्ला येथे राहत्या घरी विष पिउन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या अनिता यांचे पालक- रमेश सखाराम दुनघव, रा. बेलगाव, ता. केज यांनी 10.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन विनोद झोंबाडे याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण

 येरमाळा: एका 15 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) तीच्या राहत्या घरासमोरुन दि. 09.10.2020 रोजी 14.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आजोबांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments