बीड जिल्ह्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी उस्मानाबाद येथे अटकेत


 आंबी: शहाजी शाहत्तर काळे, वय 27 वर्षे, रा. हंगेवाडी, ता. भुम याच्यावर बीड जिल्ह्यातील पो.ठा. नेकनूर येथे गु.र.क्र. 226 / 2020 भा.दं.सं. कलम- 302, 504, 506 अन्वये दाखल आहे. तो बीड पोलीसांना तपासकामी हवा होता.


बीड पोलीसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आंबी पो.ठा. चे प्रभारी सपोनि- श्री आशिष खांडेकर यांच्या नेतृत्वाखालील पोउपनि- श्री वाघुले, पोहेकॉ- मुळे, होडशीळ, पोकॉ- रामकिसन कुंभार यांच्या पथकाने नमूद आरोपीस गुन्ह्यात वापरलेल्या मोटारसायकलसह दि. 10.10.2020 रोजी भुम शहर परिसरातून ताब्यात घेउन त्यास बीड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

No comments