Header Ads

जगातील सर्वात मोठ्या बोगद्याविषयी रोचक माहिती

 
नवी दिल्ली - आपल्या भारतात अनेक बोगदे आहेत. मात्र भारतातील एक बोगदा जगभरातील सर्वात मोठा बोगदा ठरला आहे. तब्बल ९ किलोमीटर लांबीचा हा बोगदा हिमाचल प्रदेशात तयार करण्यात आला आहे.  या बोगद्याचं नाव 'अटल टनल' असं ठेवण्यात आलं आहेभारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सीमावादावरून गेल्या काही दिवसांपासून तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात लांब हायवे बोगद्याचं उद्घाटन केलं आहे. हिवाळ्यात पूर्व लडाखला संपूर्ण भारताशी जोडणाऱ्या या बोगद्याचं नाव 'अटल टनल' असं ठेवण्यात आलं आहेअटल टनल जगातील सर्वात लांब हायवे बोगदा आहे. हा 9 किलोमीटर लांब बोगदा, मनालीला वर्षभर लाहौल-स्पिति खोऱ्यांशी जोडून ठेवणार आहे. याआधी खोऱ्यातील गावांचा दरवर्षी जवळपास 6 महिन्यांपर्यंत बर्फवृष्टीमुळे इतर शहरांशी संपर्क तुटत होता. आता 'अटल टनल'मुळे ही समस्या दूर होणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा असून याची लांबी दहा हजार फुटांहून अधिक आहे.
हिमालयाचे दुर्गम पर्वरांगांमधील पहाड खोदून निर्माण करण्यात आलेला हा बोगदा ३,०६० मीटर उंचीवर आहे.  बोगदा सुरू झाल्यानंतर हिमाचल प्रदेशातील बर्फवृष्टीमुळे देशापासून संपर्क तुटणारे सर्व भाग संपूर्ण वर्षभर जोडले जाणार आहेत. या बोगद्यामुळे मनाली आणि लेहचे अंतर कमी होणार आहे. आता रोहतंग पासद्वारे मनालीहून लेहला जाण्यासाठी ४७४ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. अटल बोगद्यामुळे हे अंतर ४२८ किलोमीटर इतके राहणार आहे. या बोगद्यामध्ये कटिंग एज तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.


'अटल टनल' पूर्ण करण्यासाठी अंदाजे 6 वर्षांहून कमी वेळ लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, जवळपास 10 वर्षांमध्ये 'अटल टनल'चं काम पूर्ण करण्यात आलं. बोगद्यामध्ये 60 मीटर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर प्रत्येक 500 मीटरवर आपातकालीन मार्ग आहेत. बोगद्यामुळे मनाली आणि लेह यांच्यातील अंतर कमी होणार असून प्रवासातील एकूण वेळेपेक्षा 4 तासांची बचत होणार आहे. तसेच आग लागल्यास बोगद्याच्या आत अग्निशामक यंत्र देखील बसविण्यात आले आहेत.


अटल बोगद्यात दर ६० मीटरपर्यंत फायर हायड्रेंट मॅकॅनिझम उपलब्ध आहे. आग लागल्यास कमीत कमी वेळात आगीवर नियंत्रण मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. दर २५० मीटरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे असलेले ऑटो इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टम उपलब्ध आहे. दर किलोमीटरच्या अंतरावर हवेचे मॉनिटरिंग देखील होणार आहे. तसेच, दर २५ मीटरवर एग्झिट आणि इव्हॅक्युशनच्या खुणाही दिसणार आहेत. संपूर्ण बोगद्यासाठी एक ब्रॉडकास्टिंग सिस्टम तयार करण्यात आली आहे.
मनाली-लेह हायवेवर रोहतंग, बारालचा, लुंगालाचा ला आणि टालंग ला असे पास आहेत. या भागात मोठी बर्फवृष्टी होत असल्यामुळे हिवाळ्यात येथे पोहोचणे अतिशय कठीण असते. या पूर्वी मनालीहून सिस्सूला पोहोचण्यासाठी ५ ते ६ तास लागतात, आता हे अंतर केवळ एका तासात पार होणार आहे. हा बोगदा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने (BRO) तयार केला आहे.


'अटल टनल'मुळे हिमाचल प्रदेशचा लाहौल-स्पिति परिसर आणि संपूर्ण लडाख आता देशातील इतर भागांशी 12 महिने जोडला जाणार आहे. कारण रोहतांग-पास‌ येथे हिवाळ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे बंद होतात. ज्यामुळे लाहौल-स्पितिमार्फत लडाखला जाणारा हायवे सहा महिन्यांसाठी बंद होत असेल. परंतु, आता 'अटल टनल'मुळे ही समस्या दूर होणार आहे.


अटल बोगद्यात ४०० मीटरसाठी वेगमर्यादा ताशी ४० किलोमीटर निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित अंतरासाठी गाडी ताशी ८० किलोमीटरच्या वेगाने धावू शकणार आहे. या बोगद्याच्या दोन्ही टोकांवर एंट्री बॅरियर्स लावण्यात येणार आहेत. दर १५० किमीवर एमर्जन्सी कम्युनिकेशनसाठी टेलिफोन कनेक्शन बसवण्यात आलेले आहे.


उस्मानाबाद लाइव्हवरील ताजे अपडेट पाहण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.... 

खालील लिंकवर क्लिक करा... 

https://www.facebook.com/osmanabadlive

No comments