उस्मानाबाद जिल्ह्यात चार अपघातात सहा जखमी, एक ठार


बेंबळी: शिवाजी संभाजी चव्हाण व सुग्रीव सुर्यकांत सगर, दोघे रा. एकंबीवाडी, ता. औसा हे दोघे दि. 08.10.2020 रोजी 23.00 पाडोळी शिवाराती रस्त्याने पायी चालत जात होते. यावेळी मिनीट्रक क्र. एम.एच. 04 ईएल 2216 च्या अज्ञात चालकाने मिनीट्रक निष्काळजीपणे चालवून शिवाजी चव्हाण व सुग्रीव सगर यांना पाठीमागुन धडक दिली. या अपघातात सुग्रीव सगर हे गंभीर जखमी होउन मयत झाले तर शिवजी चव्हाण हे किरकोळ जखमी झाले. अपघातानंतर नमूद वाहनाचा अज्ञात चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या शिवाजी चव्हाण यांनी दि. 10.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तुळजापूर: नागनाथ गोविंद सगट, रा. कसई, ता. तुळजापूर याने मो.सा. क्र. एम.एच. 25 सी 1318 ही दि. 01.10.2020 रोजी 17.30 वा. सु. आरळी- कसाई रस्त्यावर निष्काळजीपणे, हयगईने चालवून रस्त्याने पायी चालत जाणारे गावकरी- शिवाजी नवनाथ कुंभार व गुंडू शिंगाडे या दोघांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात ते दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नमूद मो.सा. चालक घटनास्थळावरुन मो.सा.सह पवार झाला. अशा मजकुराच्या शिवाजी कुंभार यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 134 अन्वये गुन्हा दि. 10.10.2020 रोजी नोंदवला आहे.


उमरगा: ट्रक क्र. के.ए. 32 बी 9511 च्या अज्ञात चालकाने दि. 09.10.2020 रोजी 19.00 वा. सु. कदेर फाटा येथील आळंद- उमरगा रस्त्यावर ट्रक निष्काळजीपणे चालवून खंडू अंबुलगे, व नागनाथ मस्कले, दोघे रा. उमरगा हे प्रवास करत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 5402 ला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघतात अंबुलगे व मस्कले हे दोघेही गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या खंडू अंबुलगे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 अन्वये गुन्हा दि. 10.10.2020 रोजी नोंदवला आहे.


उस्मानाबाद : दिव्या अंकुशराव, रा. उस्मानाबाद या दि. 05.10.2020 रोजी 13.00 वा. सु. उस्मानाबाद येथील त्रीमुर्ती किराणा दुकानासमोर ॲटोरिक्षातून उतरत होत्या. यावेळी मो.सा. क्र. एम.एच. 25 एएन 1851 च्या अज्ञात चालकाने मो.सा. चुकीच्या दिशेने चालवून दिव्या अंकुशराव यांना धडक दिली. या अपघातात दिव्या यांच्या उजव्या हाताच्या मनगटाचे हाड मोडले आहे. अपघातानंतर नमूद मो.सा. चा अज्ञात चालक घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या दिव्या यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा दि. 10.10.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments