Header Ads

नळदुर्ग : चोरीच्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात

उस्मानाबाद -  अक्षय सुनिल नितळे, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर हे दि. 15.09.2020 रोजी 02.00 वा. सु. तुळजापूर येथील मलबा हॉस्पीटलजवळील जगताप हार्डवेअरच्या दुकानासमोर आपला ट्रक उभा करुन ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते. दरम्यान त्यांच्याजवळील विवो मोबाईल फोन (किं.अं. 25,000/-रु.) अज्ञात चोरट्याने चोरला होता. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये पो.ठा. तुळजापूर येथे गु.र.क्र. 326 / 2020 दाखल आहे.

गुन्हा तपासात नमूद मोबाईल फोन वापरात असल्याचे सायबर पो.ठा. च्या निदर्शनास आले. यावरुन स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 16.09.2020 रोजी आरोपी- विशाल कल्याण काळे, वय 26 वर्षे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद मोबाईल फोन जप्त करुन उर्वरीत कारवाईस्तव त्यास तुळजापूर पो.ठा. यांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई सायबर पो.ठा. चे सपोनि- श्री. सचिन पंडीत, स्था.गु.शा. चे सपोनि-श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे, पोकॉ- मनोज मोरे यांच्या पथकाने केली आहे.

No comments