Header Ads

घरफोडीतील चोरीच्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यातस्थानिक गुन्हे शाखा: प्रकाश तुकाराम राठोड रा. लोहारा यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 21.05.2020 रोजी मध्यरात्री तोडून घरात असलेल्या कपाटातील 15 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह शाओमी कंपनीचा मोबाईल फोन चोरुन नेला होता. यावरुन पो.ठा. लोहारा गु.र.क्र. 117 / 2020 भा.दं.सं. कलम- 457, 380 नुसार दाखल आहे.

            या गुन्ह्याच्या तपासात स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पाहेकॉ- प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मारलापल्ले यांच्या पथकाने घरफोडीच्या कार्यपध्दतीचा अभ्यास केला. अशा स्वरुपाचा गुन्हा करणाऱ्या संशयीत व सराईत आरोपींकडे त्यांनी तपासाची दिशा वळवली. यातुन हा गुन्हा बेंबळी येथील अमोल शंकर माने, वय 23 वर्षे याने केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावरुन पथकाने दि. 12.09.2020 रोजी नमूद आरोपीस बेंबळी येथून ताब्यात घेतले असता सुरुवातीस त्याने तो मी नव्हेच अशी भुमीका घेतली. परंतु पोलीसांच्या पुढे तो जास्त टिकाव धरु शकला नाही. पोलीसांनी चोरीस गेलेल्या मालापैकी शाओमी कंपनीचा मोबाईल फोन त्याच्या ताब्यातून जप्त केला असुन त्यास पो.ठा. लोहाराच्या ताब्यात दिले आहे. या घरफोडीतील दागिन्यांची वासलात त्याने कशी लावली याचा लोहारा पोलीस तपास करणार आहेत.   

मोटार वाहन कायदा अंतर्गत 267 कारवाया- 52,700 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त

उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 11.09.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 267 कारवाया करुन 52,700 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

मनाई आदेशांचे उल्लंघन 34 पोलीस कारवायांत 12,800/-रु. दंड वसुल

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 11.09.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 14 कारवायांत- 2,800/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 20 कारवायांत 10,000/-रु. दंड प्राप्त.

No comments