Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे दाखलआंबी: श्रीकांत भांडवलकर, नारायण भांडवलकर, क्रांतीसिंह भांडवलकर, सत्यभामा भांडवलकर, रा. वाटेफळ, ता. परंडा अशा चौघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 10.09.2020 रोजी 11.00 वा. सु. गावातील बसथांब्याजवळ गावकरी- नामदेव घमाजी गिरवले यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नामदेव गिरवले यांनी दि. 11.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


ढोकी: क्रांतीविर नानासाहेब पाटील, रा. जागजी, ता. उस्मानाबाद हे दि. 10.09.2020 रोजी 21.45 वा. सु. आपल्या घरातुन बाहेर आले असता त्यांच्या डिस्कव्हर मो.सा. क्र. एम.एच. 25 डब्ल्यु 6252 च्या टाकीतील पेट्रोल गावातील- सचिन धनंजय सावंत हा चोरत असल्याचे दिसले. यावर त्यांनी सचिन यास पकडले असता अंधारात लपलेला त्याचा भाऊ- धिरज सावंत याने पाठीमागून येउन क्रांतीविर पाटील यांच्या डोक्यात काठी मारुन तर सचिनने डोक्यात दगड मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या क्रांतीविर पाटील यांनी उपचारानंतर दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 356, 379, 511, 34 अन्वये दि. 12.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments