Header Ads

मनाई आदेश झुगारुन दुकान चालु ठेवणाऱ्यावर गुन्हा दाखलउस्मानाबाद  -  कोविड- 19 संदर्भाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश अंमलात आहेत. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन येडशी येथील ‘ओमकार सायकल मार्ट’ हे दुकान शशिकांत अच्युतराव देशमुख, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 18.09.2020 रोजी 19.15 वा. सु. व्यवसायास चालू ठेवले. यावरुन नमूद आरोपीविरुध्द पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 


जुगार विरोधी कारवाई


पोलीस ठाणे, कळंब: तोफीक नजीर मुंढे व शारुख जलील शेख, दोघे रा. कळंब हे दोघे दि. 18.09.2020 रोजी कळंब येथील उस्मान बागवान यांच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 8,560/-रु. बाळगले असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोन्ही आरोपीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

अवैध मद्य विरोधी कारवाई


पोलीस ठाणे, लोहारा: सोमनाथ नरसिंग मोरे, रा. हिप्परगा (रवा), ता. लोहारा हा दि. 18.09.2020 रोजी गावातील आपल्या किराणा दुकानासमोर 180 मि.ली. देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. लोहारा यांच्या पथकास आढळला.

 

पोलीस ठाणे, ढोकी: अर्जुन मक्कल पवार, रा. तडवळा (क.), ता. उस्मानाबाद हा दि. 18.09.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर 30 लि. गावठी दारु (किं.अं. 1,800/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळला.

       यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद दोघांविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 

No comments