Header Ads

हरवलेले 11 मोबाईल फोन शोधुन मुळ मालकांस परतउस्मानाबाद -  मोबाईल फोन गहाळ झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास सायबर पो.ठा. द्वारे त्या मोबाईल फोनचा ऑनलाईन शोध निरंतर घेतला जाउन ते फोन मुळ मालकांना परत केले जातात. चालू वर्षात 22 जुलै रोजी 10 तर 24 ऑगस्ट रोजी 10 असे 20 मोबाईल फोन मुळ मालकांना यापुर्वीच परत करण्यात आले आहेत.

या मोहिमेतील तीसऱ्या टप्प्यात आज दि. 16.09.2020 रोजी 11 मोबाईल फोन (एकुण किं.अं. 1,88,400 ₹) पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे व परी. सहायक पोलीस अधीक्षक श्री. ऋषीकेश रावले यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले. यावेळी मोबाईल फोन मालक- विष्णु फडणीस, समाधान शेळके, किरण साळुंके, सुहास माने, अमृतसिंग बडगुजर, रंजित इंगळे, समाधान शिंदे असे हजर होते. आपले स्मार्टफोन परत मिळाल्याने त्यांनी उस्मानाबाद पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.

मोबाईल फोन शोध मोहिम स्था.गु.शा. चे पोनि- श्री. दगुभाई शेख, सायबर पो.ठा. चे सपोनि श्री. सचिन पंडीत, स्था.गु.शा. चे पोहेकॉ- किशोर रोकडे, वलीउल्ला काझी, पोना- दिपक लाव्हरेपाटील, पोकॉ- पांडुरंग सावंत, बलदेव ठाकुर, अशोक कदम, मनोज मोरे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

No comments