Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे चार गुन्हे दाखलमुरुम: भुसणी, ता. उमरगा येथील बीएसएनएल मनोरा (टॉवर) यंत्रणा खोलीचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 02.09.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील आमार राजा कंपनीच्या 25 बॅटऱ्या (किं.अं. 48,000/-रु.) चोरुन नेल्या आहेत. अशा मजकुराच्या बीएसएनएल उपविभाग, उमरगाचे अधिकारी- नरसिंग जनार्धन सुर्यवंशी यांनी दि. 11.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


भुम: लता विश्वनाथ बंडकर, रा. लक्ष्मीनगर, भुम यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 10.09.2020 रोजी मध्यरात्री तोडून आतील 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 25,000/-रु. चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या लता बंडकर यांनी दि. 11.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद -  बळीराम नामदेव सोनटक्के, रा. मेडसिंगा, ता. उस्मानाबाद यांनी स्वत:ची टीव्हीएस स्टार सिटी मो.सा. क्र. एम.एच. 25 एएन 6208 ही दि. 11.09.2020 रोजी 10.00 वा. उस्मानाबाद शहरातील राधिका कॉम्प्लेक्स येथील सोलापूर जनता बँकेच्या बाजूला लावली होती. ती 13.30 वा. सु. लावल्या जागी न आढळल्याने अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली असावी. अशा मजकुराच्या बळीराम सोनटक्के यांनी दि. 11.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 तुळजापूर: वैभव अशोक वरपे, रा. पदमशाली धर्मशाळा, तुळजापूर यांनी दि. 11.09.2020 रोजी घरासमोर लावलेली बजाज पल्सर मो.सा. क्र. एम.एच. 23 एक्यु 6561 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या वैभव वरपे यांनी दि. 12.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments