Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे दोन गुन्हे कळंब: बालाजी दामोदर शेळके, रा. डिकसळ, ता. कळंब हे दि. 15.09.2020 रोजी 07.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर थांबले होते. यावेळी गावकरी- संतोष तुकाराम पवार उर्फ बापु यांनी शेतजमीनीच्या व पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन बालाजी शेळके यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. बालाजी यांना वाचवण्यास आलेल्या त्यांच्या पत्नीसही धक्काबुक्की करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बालाजी शेळके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 बेंबळी: शेतातील सोयाबीन पिकाच्या काढणीच्या कारणावरुन संजु वसंत चव्हाण, रा. बामणी, ता. उस्मानाबाद यांना दि. 15.09.2020 रोजी 23.00 वा. सु. राहत्या घरी पत्नी- जिजाबाई चव्हाण, मुलगा- किशोर व शुभम यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या संजु चव्हाण यांनी दि. 16.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments