Header Ads

उस्मानाबाद : अवैध मद्य विरोधी, जुगार विरोधी कारवाई कळंब: योगेश माळवदे, रा. कल्पनानगर, मळंब व दादा कसबे, रा. धानोरा (शे.) हे दोघे दि. 15.09.2020 रोजी कळंब येथील सहारा मसाला दुकानाच्या शेजारी कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 3,440/-रु. बाळगले असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळले.

  परंडा: सोयल बाडेवाले, रा. समतानगर, परंडा हा दि. 15.09.2020 रोजी निळा झेंडा चौक, कळंब येथे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 360/-रु. बाळगला असतांना पो.ठा. परंडा यांच्या पथकास आढळला.

 उमरगा: अविनाश राठोड, रा. उमरगा हा दि. 16.09.2020 रोजी उमरगा येथील डीग्गी रस्त्यालगत असलेल्या एका गाळ्यासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 960/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.

यावरुन नमूद 4 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाई

ढोकी: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन ढोकी पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 15.09.2020 रोजी पोलीस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी छापे मारले. यात पळसप चौरस्ता येथील सुर्या हॉटेलमागे सुनिल किशनचंद मलहोत्रा, रा. लातुर हा 180 मि.ली. विदेशी दारुच्या 4 बाटल्या (किं.अं. 560/-रु.) बाळगलेला आढळला. तर दुसऱ्या घटनेत पळसप शिवारातीलच गारवा ढाबा येथे माणिक अर्जुन देवकते, रा. तेर, ता. उस्मानाबाद हा 180 मि.ली. देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,040/-रु.) बाळगला असतांना आढळला.

 उमरगा: संतोष लक्ष्मण जोगदंड, रा. तुरोरी, ता. उमरगा हा दि. 16.09.2020 रोजी गावातील झोपडपट्टी येथे प्लास्टीकच्या दोन घागरींमध्ये 30 लि. गावठी दारु (किं.अं. 2,000/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.

यावर पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद 3 व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत पो.ठा. ढोकी व उमरगा येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

No comments