उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे दोन गुन्हे दाखल वाशी: सकुरखाना बिकेखाना महिंद्रेखान, रा. खेजडली, ता. पोखरण, जि. जैसलमर, राज्य- राजस्थान हे दि. 26.09.2020 रोजी 21.00 मिनी ट्रक क्र. आर.जे. 07 जीए 8240 ने माल वाहुन नेत होते. प्रवासादरम्यान सरमकुंडी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर आले असता रस्त्याच्या चढावर गाडीचा वेग कमी झाल्याने मिनी ट्रक वरील टारपोलीन फाडून गाडीतील कापड गठ्ठे- 18 नग असा एकुण 72,000/-रु. चा माल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सकुरखाना महिंद्रेखान यांनी दिलेल्या प्रथम खवरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा दि. 27.09.2020 रोजी नोंदवला आहे.


 

 ढोकी: सतीश तुकाराम काळे, रा. पवारवाडी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 25.09.2020 रोजी हिंगळजवाडी शिवारातील आपल्या शेतातील गोठ्यात म्हैस व तीचे रेडकु बांधले होते. मध्यरात्रीच्या सुमारास ती म्हैस व रेडकु अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सतीश काळे यांनी दि. 28.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


No comments