Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन अपघातात तीन ठार , एक जखमी

 


 उमरगा: हैदर बशीर मुल्ला, वय 27 वर्षे, व दिलीप नारायण ठाकुर, दोघे रा. नाईचाकुर, ता. उमरगा हे दोघे दि. 13.09.2020 रोजी 15.00 मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 7417 ने नाईचाकुर येथील भगतवाडी रस्त्याने प्रवास करत होते. यावेळी दिलीप ठाकुर यांनी नमूद मो.सा. रस्त्यावरील गतिरोधकावरुन निष्काळजीपणे चालवुन आदळल्याने पाठीमागे बसलेले हैदर मुल्ला हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मारलागुन मयत झाले. अशा मजकुराच्या रशिद हुंदरसाब मुल्ला (मयताचा चुलता) यांनी दि. 23.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.वाशी: चालक- देराजभाई दुलाभाई संघीया, रा. नागेडी, ता. लाखाबाबन, जि. जामनगर, राज्य- गुजरात यांनी दि. 22.09.2020 रोजी 14.00 वा. सु. मिनी ट्रक क्र. जीजे 12 बीएक्स 9818 हा पारगांव येथील रस्त्यावर निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणाऱ्या शांताबाई दासु डोके, वय 65 वर्षे, रा. पारगांव, ता. वाशी यांना पाठीमागुन धडक दिली. या अपघातात शांताबाई डोके या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या युवराज दासु डोके (मयताचा मुलगा) यांनी दि. 23.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

 येरमाळा: बाळासाहेब उत्तम चौधरी, वय 55 वर्षे, रा. पिंपळवाडी, ता. बार्शी हे मोटारसायकलने दि. 24.09.2020 रोजी 09.05 वा. सु. रत्नापुर फाटा येथील रस्त्याने जात होते. दरम्यान कार क्र. एम.एच. 25 एएल 2775 या वाहनाने बाळासाहेब चौधरी यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात बाळासाहेब चौधरी हे जागीच मयत झाले तर मो.सा. वर पाठीमागे बसलेले अदिक धनफळ चौधरी हे जखमी झाले. अपघातानंतर नमूद कारचा अज्ञात चालक कारसह घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या पद्यराज नवनाथ गपाट, रा. इंदापुर, ता. वाशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 

No comments