Header Ads

वाशी : जुगार विरोधी कारवाई


पोलीस ठाणे, वाशी: रमेश परमेश्वर कवडे व हरीभाऊ संपत्ती गवळी, दोघे रा. वाशी हे दि. 18.09.2020 रोजी वाशी येथील पारा चौक ते इंदापुर रस्त्यालगत एका शेडसमोर सुरट जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,640/-रु. बाळगले असतांना स्था.गु.शा. यांच्या पथकास आढळले.


पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): महादेव मोतीराम राठोड व मोहन गोविंद चव्हाण, दोघे रा. अंबेजवळगे तांडा, ता. उस्मानाबाद हे दि. 21.09.2020 रोजी गावातील एमएसईबी चौकात मिलन जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 600/-रु. बाळगले असतांना पो.ठा. उस्मानाबाद (ग्रा.) यांच्या पथकास आढळले.

            यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.



 “मोटार वाहन कायदा अंतर्गत 231 कारवाया- 47,400 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.

उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 21.09.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 231 कारवाया करुन 47,400 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

 

 

मनाई आदेशांचे उल्लंघन 11 पोलीस कारवायांत 2,200/-रु. दंड वसुल.

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द पो.ठा. उमरगा व उस्मानाबाद (ग्रा.) यांनी दि. 21.09.2020 रोजी सार्वजनिक स्थळी थुंकणाऱ्या एकुण 11 व्यक्तींविरुध्द कारवाई करुन त्यातुन 2,200/-रु. दंड वसूल केला आहे.

No comments