परंडा: हयगईचे कृत्य करुन पादचाऱ्यास जखमी करणाऱ्या लाईनमनवर गुन्हा दाखल


 परंडा: महावितरणचे लाईनमन गणेश लोहार हे दि. 20.09.2020 रोजी पिंपरखेड शिवारातील चंद्रकांत धनवटे यांच्या घरासमोरील विद्युत वाहिनीला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या वीज प्रवाह बंद करुन ज्ञानेश्वर लिमकर यांच्या सहाय्याने तोडत होते. या तोडलेल्या फांद्या वीज वाहिनी व खांबावर पडल्याने तो खांब उन्मळुन गावकरी- अनंता नारायण माने यांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागुन डावा पाय मोडला. लाईनमन- गणेश लोहार यांचा निष्काळजीपणा या दुर्घटनेस  कारणीभुत आहे. अशा मजकुराच्या अनंता माने यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 287, 338 अन्वये गुन्हा दि. 21.09.2020 रोजी नोंदवला आहे.


चोरी

उमरगा: प्रविण दत्तात्रय शिरगुडे, रा. बालाजी नगर, उमरगा हे आपली हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 3444 ही दि. 20.09.2020 रोजी 11.00 वा. सु. उमरगा येथील त्रिकोळी रस्त्या बाजूस लाउन शेतात गेले. ते शेतातुन 03.00 वा. सु. परत आले असता त्यांना मोटारसायकल लावल्या जागी न दिसल्याने ती चोरीस गेली आहे. अशा मजकुराच्या प्रविण शिरगुडे यांनी दि. 22.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments