Header Ads

वाशी : गांजाची अवैध लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
वाशी - तालुक्यातील विजोरा गावातील एका शेतकऱ्यावर गांजाची अवैध लागवड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

वाशी तालुक्यातील विजोरा गावातील गट क्र. 56 / ब मधील शेतात शेत मालक- बाबुराव महादेव मेटे, वय 53 वर्षे यांनी गांजा या अंमली वनस्पतीची अवैध लागवड केल्याची विश्वसनीय खबर पोलीसांना मिळाली होती. 

यावर वाशी पो.ठा. चे पोनि- उस्मान शेख, सपोनि- चोरगे, स्था.गु.शा. चे पोनि- दगुभाई शेख, सपोनि- आशिष खांडेकर यांसह पोलीस कर्मचारी तसेच तहसील कार्यालय, वाशी येथील नायब तहसीलदार दर्जाचे शासकीय पंच यांच्या उपस्थितीत दि. 22.09.2020 रोजी 17.00 वा. सु. नमूद शेतात पोलीस पथकाने छापा टाकला. 
यावेळी दोन आंब्यांच्या झाडांमध्ये गांजाची 17 झाडे एका ओळीत लावलेली आढळली. ही गांजाची झाडे पथकाने मुळासकट उपटून जप्त केली असता त्यांचे वजन 8.5 कि.ग्रॅ. इतके आढळले. यावरुन बाबुराव मेटे यांच्याविरुध्द वाशी पो.ठा. येथे गु.र.क्र. 233 / 2020 हा नार्कोटीक्स ड्रग्ज ॲन्ड सायकोट्रॉपीक सबस्टान्स ॲक्ट कलम- 20 नुसार गुन्हा नोंदवला आहे.

No comments