Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीच्या चार घटना


 तुळजापूर: रमाकांत लक्ष्मण सोनकांबळे, रा. वाकडी, जि. रायगड हे दि. 29.09.2020 रोजी रात्री 02.30 वा.सु. औसा - तुळजापूर रस्त्याने हुंदाई आय- 20 स्पोर्ट कार एम.एच. 04 एफएफ 591 ही चालवत जात होते. प्रवासा दरम्यान टोलनाक्यापासुन साधारण 20 कि.मी. अंतरावर अनोळखी 5 व्यक्तींनी रमाकांत सोनकांबळे यांना कार बाजूस घेण्यास सांगुण बंदुकीचा धाक दाखवून, “आवाज करुन नको नाहीतर गोळी घालीन. तुझ्या जवळ जेवढे पैसे आहेत ते सर्व आम्हाला दे.” असे धमकावून रमाकांत यांच्याजवळील ओपो- 11 प्रो व सॅमसंग जे-7 हे दोन मोबाईल फोनसह रोख रक्कम 8,000/-रु. काढून घेतले. तसेच रमाकांत यांना त्यांच्याच कारमध्ये बसवून तुळजापूर पासुन 10 कि.मी. अंतरावर नळदुर्ग रस्त्यालगत असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला बांधुन त्यांची नमूद हुंदाई कार घेउन गेले. अशा मजकुराच्या रमाकांत सोनकांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 342 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तामलवाडी: भिमराव गुलचंद जाधव, रा. पिपळा (बु.), ता. तुळजापूर यांच्या पिपळा (बु.) येथील शेतातील पत्रा शेडचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 25.09.2020 रोजी तोडून आतील 15 शेळ्या व 2 बोकड चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या भिमराव जाधव यांनी दि. 29.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


कळंब: ज्ञानेश्वर दत्तोबा करवलकर, रा. सोनार गल्‍ली, कळंब यांनी दि. 28.09.2020 रोजी 15.00 वा. सु.  शिवाजी चौक, कळंब येथील राजकुमार किराणा दुकानासमोर हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 3666 ही लावली असता 16.00 वा. सु. लावल्या जागी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर करवलकर यांनी दि. 29.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 भुम: अतुल मस्कर, रा. भुम यांनी दि. 29.09.2020 रोजी 16.30 वा. सु.  भुम नगरपालीका कार्यालयासमोर हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 4484 ही लावून बाजारात गेले होते.  ते 17.15 वा. सु. परत आले असता त्यांना मो.सा. लावल्या जागी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अतुल मस्कर यांनी दि. 30.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments