उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाई उमरगा: बाबु सादीक जेवळे व रंजीत सुधाकर पाटील, दोघे रा. उमरगा हे दोघे दि. 29.09.2020 रोजी उमरगा शहरात वेगवेगळ्या दोन ठिकाणी कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम एकत्रीत 5,750/-रु. बाळगले असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा यांच्या पथकास आढळले.

उमरगा: दत्तु रामराव मदने, रा. मुन्शी प्लॉट, उमरगा हे दि. 29.09.2020 रोजी उमरगा शहरातील चाटे कॉम्प्लेक्ससमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 2,800/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.

 उस्मानाबाद (ग्रा.): अमर भास्कर शिंदे, रा. येडशी दि. 29.09.2020 रोजी येडशी येथील आकोसकर हॉटेलसमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 400/-रु. बाळगला असतांना उस्मानाबाद (ग्रा.) यांच्या पथकास आढळला.

 नळदुर्ग: 1)सागर हजारे 2)संजय भोगे 3)ख्वॉजा शेख 4)मोबीन शेख 5)मजर शेख 6)ताहेर शेख 7)मुशाहिद मोमीन, सर्व रा. नहदुर्ग हे दि. 30.09.2020 रोजी नळदुर्ग शहरातील अक्कलकोट रस्त्यालगत असणाऱ्या जगदंबादेवी शॉपींग सेंटर मधील गाळा क्र.1 मध्ये संगणकावर जुगार खेळत असतांना साहित्य व रोख रक्कम 6,480/-रु. बाळगले असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळले.यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.


अवैध मद्य विरोधी कारवाई

उमरगा: प्रेमसिंग सोमला राठोड, रा. एकोंडीवाडी, ता. उमरगा हा दि. 29.09.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर कॅनमध्ये 10 लि. गावठी दारु (किं.अं. 650/-रु.) अवैधपणे बाळगलेला पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.

कळंब: नितीन अरुण भंगुर्डे, रा. ईटकुर, ता. कळंब हा दि. 30.09.2020 रोजी गावशिवारातील कुलस्वामीनी हॉटेलसमोर देशी दारुच्या 24 बाटल्या (किं.अं. 1,248/-रु.) विनापरवाना बाळगलेला असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळला.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे म.दा.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.


No comments