वाशी : महावितरण कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात अडथळा आणनाऱ्यावर गुन्हा दाखलवाशी: ब्रम्हानंद रुद्रया स्वामी, व्यवसाय- ऑपरेटर एमएसईबी कार्यालय, पारगांव, ता. वाशी हे दि. 29.09.2020 रोजी 12.30 वा. सु. एमएसईबी कार्यालय, पारगांव येथे कर्तव्यावर होते. यावेळी सचिन नाना इंगळे, रा. रुई, ता. वाशी यांनी ब्रम्हानंद स्वामी यांना फोनद्वारे शिवीगाळ केली. तसेच त्यानंतर एमसईबी कार्यालयात येउन ब्रम्हानंद स्वामी यांची गचांडी धरुन, “मी कलेक्टर ऑफीस, पाठबंधारे ऑफीस फोडले आहे. तुझे ऑफीस तुझ्यासहीत पेटवून देईन. तु इथे ड्युटी करायची नाही पुन्हा इथे दिसलास तर ठार मारीन.” असे धमकावले. अशा प्रकारे सचिन इंगळे याने ब्रम्हानंद स्वामी यांच्या शासकीय कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन ब्रम्हानंद स्वामी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 294, 506, 507 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments