उस्मानाबादच्या सह्याद्री हॉस्पिटलला दहा हजार दंड

 
 उस्मानाबादच्या सह्याद्री  हॉस्पिटलला दहा हजार दंड


उस्मानाबाद : उस्मानाबादचे वादग्रस्त हॉस्पिटल सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलला दहा हजार दंड  करण्यात आला आहे. कोव्हीड -१९ च्या रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी रुग्णाकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळणाऱ्या डॉ.दिग्गज दापके  यांच्या सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चांगलाच दणका दिला आहे. 


या प्रकरणी हॉस्पिटलला १० हजार रुपये दंड करण्यात आला असून,  रुग्णाकडून उकळण्यात आलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे तसेच यापुढे  सह्याद्री मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटलला  रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यास प्रतिबंध/ मनाई करण्यात आली आहे. हे प्रकरण उस्मानाबाद लाइव्हने चव्हाट्यावर आणले होते. 


  उस्मानाबाद शहरातील एका नामांकित खाजगी रुग्णालयाकडून अँटीजेन टेस्टसाठी दोन हजार रुपये आकारले जात असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध झाले होते. श्री. दादा कांबळे, जिल्हा सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उस्मानाबाद यांनी सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल येथे कोविड-19 रुग्णांकडून अँटीजेन टेस्टसाठी शासकीय दर 600 रुपये असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून रु. 2000/- इतकी रक्कम घेतली जात असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे.त्यानुसार सहयाद्री हॉस्पीटल,उस्मानाबाद या रुग्णालयाच्या तपासणीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी/ऑडिटर/कर्मचारी यांना तपासणी करुन अहवाल सादर करणेबाबत सूचित केले होते. सहयाद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल,उस्मानाबाद यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा सादर करणेबाबत सूचित केले होते.


  सहयाद्री हॉस्पीटल,उस्मानाबाद करिता नियुक्त केलेले तपासणी अधिकारी श्री.शफीक कुरणे,उप कोषागार अधिकारी उ.श्रेणी,जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद यांनी तपासणी अहवाल सादर केला आहे. त्यानुसार सह्याद्री मल्टिस्पेशालिटी उस्मानाबाद येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या एकूण-82 रूग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 73 रुग्णांना रॅपिड अँटीजेन टेस्ट करिता आकारलेल्या रक्कमेची पावती देण्यात आली आहे. तर 9 रुग्णांना पावती देण्यात आलेली नाही. रॅपिड अँटीजेन टेस्टची पावती देण्यात आलेल्या 73 रुग्णांपैकी66 रुग्णांना प्रत्येकी रु.2000/- 5 रुग्णांना प्रत्येकी रु. 1600/- व 2 रुग्णांना प्रत्येकी रु. 1500/- इतकी रक्कम रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी आकारल्याचे दिसून येते.     


शासन निर्णय दि. 7 ऑगस्ट 2020 नुसार रुग्ण स्वतःहून हॉस्पीटल मध्ये कोविड-19 रॅपिड ॲटीजेन तपासणी करिता आले असेल तर त्याला कमाल रु.600/- इतका दर आकारणे आवश्यक असल्यामुळे वरिल नमूद केलेल्या 73 रूग्णांपैकी 66 रुग्णांकडून प्रत्येकी रु. 1400/-, 5 रुग्णांकडून प्रत्येकी रु. 1000/- व 2 रुग्णांकडून प्रत्येकी रु. 900/- याप्रमाणे एकूण रु. 99,200/- इसकी रक्कम जास्त आकारली असल्याचे दिसून येत असल्याने सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी शासन निर्णयाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे व्यवस्थापक, सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी सादर केलेला खुलासा संयुक्तिक असल्याचे दिसून येत नाही.


     जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,उस्मानाबाद यांनी प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल,उस्मानाबाद या रुग्णालयाने कोविड-19 च्या रॅपिड अँटीजेन टेस्टकरिता रुग्णांना शासनमान्य दरापेक्षा जास्त आकारणी करणे तसेच काही रुग्णांना रॅपिड अँटीजेन टेस्टच्या देयकाची पावती न देणे अशा गंभीर स्वरुपाचे कृत्य केले असल्याने सदर प्रकरणी पुढील प्रमाणे कार्यवाही करणेबाबत आदेश दिले आहेत.


सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांना कोविड-19 ची रॅपिड अँटीजेन टेस्ट करणेस या आदेशानंतर पुढील कालावधीत प्रतिबंधामनाई करण्यात येत आहे. व्यवस्थापक, सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी या आदेशात नमूद केलेल्या पावती दिलेल्या 73 रुग्णांना रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी शासनमान्य दरानुसार रु. 600/- इतक्या रक्कमपेक्षा अधिकची आकारलेली रुग्णनिहाय रक्कम (एकुण रक्कम रु. 99,200/-) तसेच पावती न दिलेल्या 9 रुग्णांना रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी शासनमान्य दरानुसार रु. 600/- इतक्या रक्कमपेक्षा अधिकची आकारलेली रुग्णनिहाय रक्कम त्या त्या रुग्णाच्या (एकुण 82 रुग्ण) बँक खात्यावर या आदेशाच्या दिनांकापासून 8 दिवसांचे आत जमा करावी व त्याबाबतचा अनुपालन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे सादर करावा.


 सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी रॅपिड अँटीजेन टेस्ट केलेल्या 9 रुग्णांना पावती दिली नसल्याचे दिसून आले असून त्यामुळे त्यांनी भारतीय साथरोग अधिनियम 1897, महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 व शासन निर्णयातील तरतुदींचे उल्लंघन केले आहे. या उल्लंघनाकरिता सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांना रु. 10,000/- दंड आकारण्यात येत असून व्यवस्थापक, सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद यांनी सदर दंडाची रक्कम तहसिल कार्यालय, उस्मानाबाद येथे विहित लेखाशिर्षाखाली जमा करावी व त्याबाबत अनुपालन अहवाल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष,जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे सादर करावा.


           या आदेशाचे उल्लंघन केल्यास सह्याद्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल, उस्मानाबाद हे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11, भारतीय साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व  बॉम्बे नर्सिग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्ट 1949 व इतर लागू होणा-या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील. असे ही आदेशात  नमुद केले आहे.


 उस्मानाबादच्या सह्याद्री  हॉस्पिटलला दहा हजार दंड

 उस्मानाबादच्या सह्याद्री  हॉस्पिटलला दहा हजार दंड

 उस्मानाबादच्या सह्याद्री  हॉस्पिटलला दहा हजार दंड

उस्मानाबाद : अँटिजेनच्या नावाखाली रुग्णांची लूट

From around the web