Header Ads

उस्मानाबाद : चोरीच्या 5 मोटारसायकल जप्त, 3 आरोपी ताब्यात


उस्मानाबाद - चोरीस गेलेल्या  5 मोटारसायकली  जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून, पोलिसांनी  3 आरोपीना ताब्यात घेतले आहे. 


पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांच्या  मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. चे पोउपनि- पांडुरंग माने, पोहेकॉ- प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, शेळके, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने पाथर्डी, ता. कळंब येथील- 1) अनिल लाला पवार 2) संतोष लाला पवार 3) शिवा लक्ष्मण पवार यांना दि.25.09.2020 रोजी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यात नोंदणी क्रमांक पट्टी नसलेल्या 5 मोटारसायकल आढळल्या. त्या वाहनांच्या मालकी- ताबा या विषयी ते योग्य स्पष्टीकरण देत नसल्याने पथकाने माहिती घेतली असता त्यातील 4 मो.सा. चोरीचे खालील 4 गुन्हे दाखल असल्याचे समजले.

1) तामलवाडी पो.ठा. गु.र.क्र.- 127/ 2020- होंडा शाईन मोटारसायकल.

2) उस्मानाबाद (ग्रा.) गु.र.क्र.- 212 / 2020- टिव्हीएस आपाचे मोटारसायकल.

3) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. 211 / 2020- हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल.

4) मुरुड पो.ठा. गु.र.क्र. 85 /2019- बजाज सीटी 100 मोटारसायकल.

5) होंडा शाईन मो.सा.: वाहन नोंदणी- मालकी निष्पन्न होत नसल्याने चोरीचे असण्याची शक्यता आहे.

नमूद 5 मोटारसायकलसह चोरी करण्यासाठी आरोपींनी वापरलेली स्वत:ची होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 13 बीजे 0855 हिच्यासह एकुण 6 मोटारसायकल पथकाने जप्त केल्या आहेत. उर्वरीत तपासकामी आरोपींस उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

No comments