भूम : मनाई आदेश झुगारुन तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल


भुम: कोविड- 19 संदर्भाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश अंमलात आहेत. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन ईकबाल बशीर तांबोळी व हुजेब बशीर बागवान, दोघे रा. भुम हे दि. 22.09.2020 रोजी 16.25 वा. सु. गोलाई चौक, भुम येथील ‘तांबोळी पानस्टॉल’ मध्ये तंबाखुची विक्री करत असतांना पो.ठा. भुम यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपीविरुध्द पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

जुगार विरोधी कारवाई

कळंब: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 22.09.2020 रोजी 15.00 ते 16.00 वा. च्या दरम्यान कळंब शहरात दोन ठिकाणी छापे मारले. यात कळंब बसस्थानकाच्या समोर रोहिदास ज्ञानोबा गायसमुद्रे, रा. सावरगाव (पु.), ता. कळंब हा कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,130/-रु. बाळगलेला आढळला. तर दुसऱ्या घटनेत कळंब येथील आठवडी बाजार मैदानात सलिम इब्राहीम बागवान, रा. सावरगाव (पु.), ता. कळंब हा कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 420/-रु. बाळगलेला आढळला.यावरुन नमूद 2 व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत  कळंब पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.


 


 

No comments