Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे चार गुन्हे दाखलतुळजापूर: आपल्या पत्नीस शिवीगाळ केल्याचा जाब विकास बाबुराव निंबाळकर, रा. अपसिंगा, ता. तुळजापूर यांनी दि. 02.09.2020 रोजी 15.00 वा. सु. अपसिंगा येथे गावकरी- राजकुमार प्रकाश कदम व मुकूंद प्रकाश कदम यांना विचारला. त्यावर चिडुन जाउन त्या दोघांनी विकास निंबाळकर यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्या तुंब्याने डोक्यात वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या विकास निंबाळकर यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब: साखरबाई दगडू काळे, रा. शिवाजीनगर, कळंब यांना दि. 03.09.2020 रोजी 23.30 वा. सु. कळंब येथे गावकरी- शहाजी वाघमारे, शिवाजी वाघमारे यांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या साखरबाई काळे यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 सह ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 ढोकी: मिरा बिरु डोलारे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद यांसह त्यांचे पती- बिरु डोलारे व सवत- संगीता यांना दि. 04.09.2020 रोजी 18.30 वा. सु. त्यांच्या राहत्या घरासमोर गावकरी- प्रविण डांगे, सचिन डांगे, गोरोबा डांगे, ललीता डांगे यासर्वांनी सांडपाणी रस्त्यावर सोडल्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या मिरा डोलारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग: प्रविण सुनिल चव्हाण, रा. वडाचा तांडा, ता. तुळजापूर हे दि. 04.09.2020 रोजी 19.00 वा. सु. आपल्या राहत्या घराजवळ होते. यावेळी गावकरी- तानाजी सुभाष राठोड यांनी मागील भांडणाच्या कारणावरुन प्रविण यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, सत्तुरने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या प्रविण चव्हाण यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                                                 

No comments