उस्मानाबाद : नोंदणी क्रमांक नसलेल्या मोटारसायकलसह संशयीत ताब्यात


उस्मानाबाद -  स्था.गु.शा. चे पो.नि.दगुभाई शेख, पोउपनि श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले यांचे पथक दि. 28.04.2020 रोजी रात्र गस्तीस होते. गस्ती दरम्यान आनंदनगर पो.ठा. हद्दीत सांजा गावाजवळ एक तरुण नोंदणी क्रमांक नसलेली मोटारसायकल संशयीतरित्या बाळगलेला आढळला. पथकाने त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव- रामदास लाला शिंदे उर्फ आकाश, वय 26 वर्षे, रा. पार्डी फाटा, ता. वाशी असे सांगीतले. त्याच्या ताब्यातील मोटारसायकलची नोंदणी, मालकी- ताबा तो शाबीत करु न शकल्याने पथकाने त्यास मोटारसायकलसह ताब्यात घेउन पुढील कार्यवाहिस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे. ही मोटारसायकल चोरीची आहे काय? या अनुशंगाने आनंदनगर पोलीस तपास करणार आहेत.

No comments