Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाई


 कळंब: शाहरुख आलमगिर शेख, रा. डिकसळ, ता. कळंब हा दि. 28.09.2020 रोजी कळंब शहरातील गुलमोहर हॉटेलच्या शेजारील पत्रा शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,360/-रु. बाळगले असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या पथकास आढळला.

 कळंब: रफिक करीम पठाण, रा. डिकसळ, ता. कळंब हा दि. 28.09.2020 रोजी कळंब शहरातील होळकर चौक येथील एका पत्रा शेडमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 430/-रु. बाळगला असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळला.

उस्मानाबाद -  राजाभाउ भिमा कांबळे, रा. उस्मानाबाद व अन्य एक व्यक्ती असे दोघे दि. 28.09.2020 रोजी उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेजच्या समोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,780/-रु. बाळगला असतांना स्था.गु.शा. यांच्या पथकास आढळला.

यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 शिराढोन: आकाश रंगनाथ राठोड, रा. शिराढोन, ता. कळंब हा दि. 28.09.2020 रोजी गावातील जायफळ रस्त्याच्यालगत देशी दारुच्या 48 बाटल्या (किं.अं. 2,496/-रु.) विनापरवाना बाळगलेला पो.ठा. शिराढोन यांच्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन त्याच्याविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments