उस्मानाबाद : घरफोडीतील दागिने व मोबाईल फोन जप्त, आरोपी ताब्यात


उस्मानाबाद - शहरातील पापनाश नगर भागात घरफोडी करून दागिने व मोबाईल फोन लंपास करणाऱ्या एका चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. 


 कल्पना सोनवणे, रा. पापनाश नगर, उस्मानाबाद यांच्या घराचा दरवाजा पावसाने फुगल्याने व्यवस्थीत बंद होत नव्हता. याचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने दि. 17.09.2020 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरातील 25 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने व वस्तु, रोख रक्कम 3,000/-रु. रेडमी व आयटेल असे दोन मोबाईल फोन चोरुन नेले होते. यावरुन पो.ठा. उस्मानाबाद (श.) येथे भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गु.र.क्र. 322/ 2020 दाखल आहे.


            पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांच्या  मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याची कार्यपद्धती लक्षात घेउन स्था.गु.शा. चे सपोनि- आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे, संतोष गव्हाणे यांच्या पथकाने शोध मोहिम चालू केली. यात आरोपी- महादेव ग्यानबा काकडे, वय 37 वर्षे, रा. उस्मानाबाद यास दि. 24.09.2020 रोजी उस्मानाबाद शहरातून ताब्यात घेतले. तपासादरम्यान चोरीस गेलेल्या नमूद माला पैकी सोने- चांदीचे दागिने व रेडमी मोबाईल फोन त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात आला असुन चोरीच्या उर्वरीत मालाविषयी पो.ठा. उस्मानाबाद (श.) हे पुढील तपास करणार आहेत.

No comments