Header Ads

तुळजापूर : चोरीची मोटारसायकल जप्त, आरोपी अटकेत

 


तुळजापूर  -  रामेश्वर नागनाथ नन्नवरे, रा. माऊलीनगर, तुळजापूर यांच्या घरासमोरील हिरो हंक मो.सा. क्र. एम.एच. 25 एए 1212 ही दि. 09.09.2020 रोजी मध्यरात्री चोरीस गेली होती. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 नुसार पो.ठा. तुळजापूर येथे गु.र.क्र. 318 / 2020 नोंदवला आहे.


  गुन्हा तपासादरम्यान तुळजापूर तालूक्यातील ढेकरी येथे राहणारा अक्षय मारुती शिंदे उर्फ अखिल, वय 23 वर्षे हा चोरीची मोटारसायकल वापरत असल्याची गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. पांडुरंग माने, पोहेकॉ- प्रमोद थोरात, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, कावरे, पोकॉ- अविनाश मरलापल्ले, आरशेवाड यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने दि. 22.09.2020 रोजी नमूद आरोपीस वरील चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव त्यास पो.ठा. तुळजापूर च्या ताब्यात दिले आहे. 


मनाई आदेश झुगारुन हॉटेल चालु ठेवणाऱ्यावर  गुन्हा दाखल


उस्मानाबाद (ग्रा.): कोविड- 19 संदर्भाने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष यांच्या आदेशाने जिल्ह्यात विविध मनाई आदेश अंमलात आहेत. त्या मनाई आदेशांचे उल्लंघन करुन काशिनाथ जालींदर नलावडे, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांनी येडशी येथील ‘हॉटेल गणेश’ हे दि. 21.09.2020 रोजी 18.00 वा. सु. व्यवसायास चालू ठेवले. यावरुन नमूद आरोपीविरुध्द पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments