Header Ads

ढोकी : सुनेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल


ढोकी: माहेरहुन दागिने- पैसे आणावे असा तगादा सासरकडील 1) गोरोबा तुकाराम शिंदे (पती) 2) शालन (सासु) 3) तुकाराम (सासरा), तीघे रा. तेर, ता. उस्मानाबाद यांनी सुन- सोनाली गोरोबा शिंदे, वय 24 वर्षे, हिच्याकडे लावला होता. त्याकरीता नमूद लोक सोनाली हिचा वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करत होते. सतत होणाऱ्या या छळाला सोनालीने दि. 18.09.2020 रोजी राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली आहे. 


अशा मजकुराच्या सोनाली यांच्या आई- नंदा धुळाप्पा कांबळे, रा. करजखेडा, ता. उस्मानाबाद यांनी अकस्मात मृत्यु क्र. 36/2020 च्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरुन नमूद 3 व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 323, 34 अन्वये गुन्हा दि. 20.09.2020 रोजी नोंदवला आहे.


 

No comments