Header Ads

सुनेची आत्महत्या: सासरकडील लोकांवर गुन्हा दाखलभूम : हर्षदा विक्रम जाधवर, वय 26 वर्षे, रा. खडकोणी, ता. बार्शी यांनी काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली. हर्षदा या 7 महीन्याच्या गरोदर असुन त्यांना पहिली मुलगी झाल्याने मुलगा होत नसल्याच्या व माहेराहुन पैसे आनत नसल्याच्या कारणावरुन 1) विक्रम मल्हारी जाधवर (पती) 2) मल्हारी (सासरा) 3) मैनाबाई (सासु) यांनी हर्षदा यांचा  सतत शारिरीक व मानसिक छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याने हर्षदा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या हर्षदा यांचे पिता- दादाराव सुर्यभान सोनवणे यांनी दि. 13.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 अल्पवयीन मुलीचे अपहरण

 तुळजापूर: “कपडे खरेदी करुन येते.” असे सांगुन एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 13.09.2020 रोजी 10.30 वा. सु. घराबाहेर गेली. ती परत न आल्याने कुटूंबींयानी तीचा शोध घेतला परंतु काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन तीचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये दि. 13.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments