Header Ads

अल्पवयीन मुलीचे अपहरण
उस्मानाबाद जिल्हा: एका 17 वर्षीय मुलीचे (नाव- गाव गोपनीय) तीच्या राहत्या घरुन गावातीलच एका तरुणाने दि. 07.09.2020 रोजी 01.00 वा. सु. अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलाच्या प्रथम खबरेवरुन संबंधीत तरुणाविरुध्द भा.दं.सं. कलम- 363 अन्वये दि. 07.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

  चोरी

पोलीस ठाणे, परंडा: सागर मोहन जाधव, रा. खासापुरी चौक परंडा यांनी दि. 03.09.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एपी 3102 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सागर जाधव यांनी दि. 07.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: गौस रहीमतुल्ला शेख व्यवसाय- बांधकाम मिस्तरी, रा. शांताई रेसीडन्सी, तुळजापूर यांनी दि. 12.08.2020 रोजी राहत असलेल्या ठिकाणी बांधकामावर आपल्या भावाचा विवो वाय- 83 मोबाईल फोन व मित्राचा ओप्पो ए- 37 एफ मोबाईल फोन चार्जींगला लावले होते. ते दोन्ही मोबाईल मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. अशा मजकुराच्या गौस शेख यांनी दि. 08.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  
अपघात

पोलीस ठाणे, उमरगा: कार क्र. एम.एच. 24 व्ही 4021 च्या अज्ञात चालकाने दि. 30.08.2020 रोजी 19.30 वा. सु. उमरगा येथील उमरगा चौरस्ता- गुलबर्गा रस्त्यावरील पुलाजवळ नमूद कार निष्काळजीपणे चालवून मो.सा. क्र. एएडी- 4575 वरुन जात असलेल्या माधव पांडुरंग गायकवाड, रा. औराद, ता. उमरगा यांना समोरुन धडक दिली. या अपघातात माधव गायकवाड हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमीस उपचारकामी न नेता, पोलीसांना खबर न देता संबंधीत कार चालक घटनास्थळावरून पसार झाला. अशा मजकुराच्या माधव गायकवाड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ)(ब) अन्वये दि. 07.09.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

No comments