उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी जुगार विरोधी कारवाई परंडा: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उपविभागीय पोलिस अधिकारी, भुम यांच्या पथकाने दि. 27.09.2020 रोजी बार्शी ते परंडा रस्त्यालग असलेल्या वारदवाडी चौकाजवळ छापा मारला. यावेळी बाळासाहेब चौधरी यांच्या पत्रा शेडमध्ये 1)विकास खबाले 2)चंद्रकांत गायकवाड 3)आश्रु कांबळे, तीघे रा. चांदणी 4)राजेंद्र खुने, रा. आसु 5)मनोज कठारे, रा. बार्शी हे सर्वजण गोलाकार बसुन तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम 3,200/-रु. बाळगले असतांना पोलीसांना आढळले. यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत परंडा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद -  जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 27.09.2020 रोजी उस्मानाबाद शहरातील जिजामाता उद्यानजवळील एका पिंपळाच्या झाडाखाली छापा मारला. यावेळी 1)अजय गुरव 2)अमित शेरकर 3)सौरभ काकडे 4)राहीत तोडकर, सर्व रा. उस्मानाबाद हे गोलाकार बसुन तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम 8,260/-रु. बाळगले असतांना पोलीसांना आढळले. यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत उस्मानाबाद (श.) पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.अवैध मद्य विरोधी कारवाई


तुळजापूर: प्रकाश शिवराम वडणे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर हा दि. 28.09.2020 रोजी कुंभारी गावात 180 मि.ली. देशी दारुच्या 18 बाटल्या (किं.अं. 936/-रु.) विनापरवाना बाळगलेला पो.ठा. तुळजापूर यांच्या पथकास आढळला. यावरुन अवैध मद्य जप्त करुन त्याच्याविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

No comments