काक्रंबा : मोटारसायकलला अज्ञात वाहनाची धडक : १ ठार, १ जखमी


उस्मानाबाद : काक्रंबा, ता. उस्मानाबाद येथील दिपक गवळी, वय 26 वर्षे, व युवराज संभाजी साबळे हे दोघे मित्र दि. 19.09.2020 रोजी बावी फाटा आश्रम शाळेसमोरील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 च्या उड्डानपुलावरुन होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 05 सीजे 5140 ने जात होते. यावेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या मो.सा. ला पाठीमागून ठोकर दिली. या अपधातात युवराज साबळे हे जागीच मयत झाले तर दिपक गवळी हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधीत अज्ञात वाहनाचा चालक वाहनासह घटनास्थळावरुन पसार झाला. अशा मजकुराच्या दिपक गवळी यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 


No comments