Header Ads

प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ बाळगणाऱ्यावर पोलीसांतर्फे गुन्हा दाखलपोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): मौजे घाटंग्री येथे एक ईसम गुटखा- तंबाखुजन्य पदार्थ बाळगुन असल्याची गोपनीय खबर उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास मिळाली. यावर दि. 01.09.2020 रोजी 17.40 वा. सु. तेथे छापा टाकण्यात आला. यावेळी राघु शाहु शिंदे, हा स्वत:च्या राहत्या घरासमोर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला 50,680/-रु. किंमतीचा गुटखा, सुगंधी तंबाखु असा माल बाळगलेला आढळला. यावरुन पोकॉ- नागेश केंद्रे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.स. 188, 272, 273 सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

पोलीस ठाणे, ढोकी: किशोर भगवानराव वाघमारे, रा. दाउतपुर, ता. उस्मानाबाद हा दि. 01.09.2020 रोजी गावातील कोळेवाडी रस्त्यालगत अवैधपणे 20 लिटर गावठी दारु (किं.अं. 900/-) बाळगलेला  तर दुस-या घटनेत त्याच दिवशी दत्ता पंडीत आदमाने, रा. डकवाडी हा तेर येथील मित्रप्रेम हॉटेल येथे देशी- विदेशी दारुच्या 21 बाटल्या (किं.अं. 2,205/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. ढोकी यांच्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, बेंबळी: अब्दुल मुक्तदीर खाजामीया व रवी जयसिंग खापरे, दोघे रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद हे दि. 01.09.2020 रोजी बेंबळी येथे वेगवेगळ्या दोन ठिकाणी दारुचा अवैधपणे विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्रीत देशी दारुच्या 30 बाटल्या (किं.अं. 1,560/-रु.) बाळगले असतांना पो.ठा. बेंबळी यांच्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, वाशी: कल्याण लक्ष्मण थोरात, रा. ईट, ता. भुम हा दि. 01.09.2020 रोजी मौजे झेंडेवाडी शिवारातील शिवराज बिअरबार मध्ये विदेशी दारुच्या 28 बाटल्या (किं.अं. 4,200/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना पो.ठा. वाशी यांच्या पथकास आढळला.
       यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

No comments