कळंब : अवैध मद्य विरोधी कारवाई


कळंब: ताई राजु काळे, रा. जुनी दुध डेअरी, कळंब या दि. 24.09.2020 रोजी राहत्या परिसरात अवैध गावठी दारु तयार करण्याच्या उद्देशाने गावठी दारु निर्मीतीचा 400 लि. द्रवपदार्थ व गावठी दारु 5 लि. (साहित्यासह एकुण किं.अं. 16,250/-रु.) बाळगल्या असतांना पो.ठा. कळंब यांच्या पथकास आढळल्या.

 उस्मानाबाद (ग्रा.): अशोक तानाजी साबळे, रा. आंबेजवळगा, ता. उस्मानाबाद हा दि. 24.09.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर 45 लि. गावठी दारु (साहित्यासह किं.अं. 2,770/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना स्था.गु.शा. यांच्या पथकास आढळला.

 यावरुन पोलीसांनी गावठी दारु निर्मीतीचा द्रव पदार्थ जागीच नाश करुन गावठी दारु जप्त करुन नमूद दोघांविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.


जुगार विरोधी कारवाई

उस्मानाबाद -  जावेद इब्राहीम अत्तार व सोमनाथ चपने, दोघे रा. उस्मानाबाद हे दि. 24.09.2020 रोजी उस्मानाबाद शहरातील ‘अरनुमन पानटपरी’ समोरील मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 3,640/-रु. बाळगले असतांना पो.ठा. उस्मानाबाद (श.) यांच्या पथकास आढळले. यावरुन नमूद दोघांविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

No comments