Header Ads

चोरीच्या 2 मोबाईल फोनसह आरोपी ताब्यातस्थानिक गुन्हे शाखा: चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा ऑनलाईन शोध सायबर पो.ठा. मार्फत निरंतर घेतला जातो. अशाच एका प्रकरणात शांताई रेसीडन्सी, तुळजापूर येथील बांधकामावरुन दि. 12.08.2020 रोजी मिस्तरींचे विवो वाय- 83 व ओप्पो ए- 37 एफ असे दोन मोबाईल फोन मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेले होते. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 नुसार पो.ठा. तुळजापूर येथे गु.र.क्र. 314 / 2020 दाखल आहे.

गुन्हा तपासात नमूद दोन्ही मोबाईल फोन वापरात असल्याचे सायबर पो.ठा. च्या निदर्शनास आले. यावरुन स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 10.09.2020 रोजी आरोपी- विशाल कल्याण काळे, वय 26 वर्षे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद मोबाईल फोन जप्त करुन त्यास तुळजापूर पो.ठा. यांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई सायबर पो.ठा. चे सपोनि- श्री. सचिन पंडीत, स्था.गु.शा. चे सपोनि-श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे, पोकॉ- मनोज मोरे यांच्या पथकाने केली आहे.

No comments