Header Ads

गुटखा- सुगंधी तंबाखुची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखलपोलीस ठाणे, मुरुम: मुरुम पो.ठा. चे पथक दि. 04.09.2020 रोजी पहाटे 04.30 वा. सु. रात्रगस्त करत होते. यावेळी मुरुम- अक्कलकोट रस्त्यावरील कंटेकुर मोड येथे अनिल पांडुरंग कांबळे उर्फ अमोल, रा. चुंगी, ता. अक्कलकोट हा मो.सा. क्र. एम.एच. 13 एबी 3937 वरुन पोते वाहुन नेत असलेला दिसला. पोलीसांना पाहुन तो मोटारसायकल व पोते जागेवर सोडून अंधारात पसार झाला. पोलीसांना त्या पोत्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधी तंबाखु असा 31,200/-रु. चा माल आढळला. अशा प्रकारे अनिल कांबळे याने प्रतिबंधीत पदार्थ बाळगुन मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पोना- अमर महानुरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  चोरी.
पोलीस ठाणे, तुळजापूर: शैलेश दत्तात्रय माडजे, रा. तिर्थ (बु.), ता. तुळजापूर यांनी दि. 22.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली होंडा ड्रीमयोगा मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 1807 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शैलेश माडजे यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नांदवला आहे.

पोलीस ठाणे, तुळजापूर: सागर सुरेश साळुंके, रा. छत्रपतीनगर, तुळजापूर यांनी दि. 20.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली हिरो पॅशनप्रो मो.सा. क्र. एम.एच. 13 बीके 0697 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सागर साळुंके यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


  अपघात.
पोलीस ठाणे, उमरगा: बालाजी विश्वनाथ मंडले, वय 50 वर्षे, रा. कराळी, ता. उमरगा हे दि. 31.08.2020 रोजी 10.20 वा. सु. उमरगा येथील पर्यायी रस्त्याच्या वळणावर मो.सा. क्र. एम.एच. 25 एस 9390 ही चालवत जात होते. दरम्यान कार क्र. एम.एच. 12 पीझेड 7361 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे चालवून बालाजी मंडले यांच्या मोटारसायकलला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात बालाजी मंडले हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या दशरत बाबुराव कलमले यांनी दि. 03.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments