Header Ads

मुरूम : कारने धडक दिल्याने बातमीदाराचा मृत्यू लोहारा: स्विफ्ट कार क्र. एम.एच. 13 सीके 0467 च्या अज्ञात चालकाने दि. 01.09.2020 रोजी 15.30 वा. सु. विलासपुर शिवारातील पांढरी परिसरातील जेवळी रस्त्यावर निष्काळजीपणे कार चालवून अखीब आयुब ईमडे व शफी इमामसाब ईमडे, दोघे रा. यशवंतनगर, मुरुम, ता. उमरगा हे प्रवास करत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 25 ईए 4525 ला धडक दिली.

या अपघातात मोटारसायकल खड्ड्यात जाउन पडल्याने शफी ईमडे ( बातमीदार) हे मयत झाले तर अखीब ईमडे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचारास न नेता, अपघाताची खबर पोलीसांना न देता अज्ञात चालक स्विफ्ट कारसह घटनास्थळावरुन निघून गेला. अशा मजकुराच्या अखीब ईमडे यांनी दि. 02.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments