Header Ads

तामलवाडी : 2 गुन्ह्यातील 2 पाहिजे आरोपी अटकेत


तामलवाडी: पोलीस ठाणे तामलवाडी गु.र.क्र. 59 / 2016 भा.दं.सं. कलम- 379, 34 या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- गणेश गोपनपाळे, वय 26 वर्षे, रा. परळी, जि. बीड हा गेली 4 वर्षे पोलीसांना तपासकामी हवा होता. पोलीसांनी त्यास ताब्यात घेण्यास वेळोवेळी प्रयत्न केले असता तो मिळुन येत नव्हता. तर गु.र.क्र. 90/ 2019 या जुगार प्रतिबंधक कायद्यातील आरोपी- यासीर बागवान, वय 26 वर्षे,  रा. सोलापूर हा गेली वर्षभर पोलीसांना गुंगारा देत होता. या दोघांस तामलवाडी पोलीसांनी आज दि. 18.09.2020 रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणांहुन ताब्यात घेतले आहे.


 “मोटार वाहन कायदा अंतर्गत 175 कारवाया- 36,800 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”

उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 17.09.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 175 कारवाया करुन 36,800 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

“मनाई आदेशांचे उल्लंघन 33 पोलीस कारवायांत 7,200/-रु. दंड वसुल.”

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द उस्मानाबाद पोलीस दलाने दि. 17.09.2020 रोजी जिल्हाभरात खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 31 कारवायांत- 6,200/- रु. दंड प्राप्त.

2)सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे: 1 कारवाईत 500/-रु. दंड प्राप्त.

3)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 1 कारवाईत 500/-रु. दंड प्राप्त.

No comments