Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन अपघातात एक मयत, दोन जखमी


 उमरगा: शेषाबाई शिवाजी डोंगरे, वय 49 वर्षे, रा. जकेकुर, ता. उमरगा या दि. 21.09.2020 रोजी 14.15 वा. सु. उमरगा चौरस्ता येथे बसची वाट पाहत थांबल्या होत्या. यावेळी चालक- नुरखॉ कायमखॉ सिंधी- पटेल, रा. जोधपुर जि. जोधपुर, राज्य- राजस्थान याने ट्रक क्र. आर.जे. 19 जीएफ 7449 ही निष्काळजीपणे, हयगईने चालवून शेषाबाई डोंगरे यांना धडक दिली. या अपघातात शेषाबाई या गंभीर जखमी होउन मयत झाल्या. अशा मजकुराच्या दत्ता विठ्ठल डोंगरे, रा. जकेकुर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


 तुळजापूर: त्रिंबक मलिकार्जुन स्वामी, रा. सांगवी (काटी), ता. तुळजापूर व त्यांचा मुलगा- महेश स्वामी असे दोघे दि. 27.07.2020 रोजी पहाटे 04.30 वा. सु. सांगवी मार्डी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन हिरो एचएफ डिलक्स मो.सा. क्र. एम.एच. 13 बीएक्स 2638 ने प्रवास करत होते. यावेळी मो.सा. समोर बैलगाडी दिसली असता महेश स्वामी यांनी मो.सा. नियंत्रीत करण्याच्या प्रयत्नात अनियंत्रीत होउन घसरली. या अपघातात महेश हा स्वत: जखमी झाला असुन पाठीमागील त्रिंबक स्वामी हे बैलगाडीवर आदळल्याने गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या त्रिंबक स्वामी यांनी उपचारानंतर दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 22.09.2020 रोजी नोंदवला आहे.


 

No comments