Header Ads

शिराढोण: सोयाबीनचे पिक व तुषारसिंचन संच जाळून आर्थिक नुकसान


शिराढोण: विश्वनाथ शंकर मस्के, रा. मेंढा, ता. कळंब यांच्या नायगांव शेत गट क्र. 499 व 519 मधील सोयाबीन पिकाचे 2 ढिगारे व तुषारसिंचन संच अज्ञात व्यक्तीने दि. 20.09.2020 रोजी मध्यरात्री जाळून अंदाजे 4,00,000/-रु. चे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या विश्वनाथ मस्के यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  चोरी

 बेंबळी: संतोष कोळगे, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद यांनी दि. 14.09.2020 रोजी रात्री आपल्या घरासमोर हिरो होंडा मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 2464 ठेवली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी चोरीस गेल्याचे त्यांना आढळले. यावरुन संतोष कोळगे यांनी दि. 21.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

No comments