येरमाळा: शोभेची दारु- फटाके बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल


येरमाळा: महेश लक्षमण देशमुख, रा. कात्री, ता. तुळजापूर हे दि. 19.09.2020 रोजी 14.00 वा. सु. तेरखेडा येथील सुहासिनी मंगल कार्यालयाजवळील आपल्या दुकानामध्ये बेकायदेशीरपणे शोभेची दारु- फटाके एकुण 62,700/-रु. किंमतीचे बाळगले असतांना येरमाळा पोलीसांना आढळले. महेश देशमुख यांनी दुकानालगतचे मंगल कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग येथे वावरत असलेल्यांच्या जिवीतास धोका निर्माण होउ शकेल अशा प्रकारे शोभेची दारु- फटाक्यांचा साठा करुन तसेच त्यांपासून होणाऱ्या संभाव्य धोक्याविरुध्द योग्यती खबरदारी न घेता विस्फोटक नियम 2008 चे उल्लंघन केले.


    यावरुन पो.ठा. येरमाळा चे सपोनि- श्री. पंडीत सोनवणे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 336, 286 आणि भारतीय स्फोटक कायदा कलम- 5, 9 (ब) अन्वये गुन्हा दि. 20.09.2020 रोजी नोंदवला आहे.

No comments